Last Updated: Thursday, November 7, 2013, 07:50
www.24taas.com, झी मीडिया, भाईंदरमुलीने प्रेमविवाह केला म्हणून पित्याने तिचा खून करून काटा काढलाच शिवाय मित्राच्या मदतीने बलात्कार करून मुलगी-वडील नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना भाईंदरमधील काशीमीरा परिसरात घडली. या धक्कादायक घटनेची चीड व्यक्त करण्यात येत आहे.
आपल्या मुलीने मनाविरूद्ध प्रेमविवाह केल्याने याचा वडिलांना राग आला. या रागापोटी पित्याने मित्र आणि स्वत:च मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी वडील रमेश राजभर (४५) आणि मित्र शिवचंद्र राजभर (४२) या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी खून आणि बलात्काराची कबुली दिली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझिपूर जिल्ह्यातील कोमलपूर येथील मीरा (नाव बदलले आहे.) हिने कुटुंबियांच्या मनाविरूद्ध विवाह केला. विवाहानंतर ती भाईंदर येथे राहत होती. मुलीने प्रेमविवाह केल्याने वडिलांना राग आला. वडील रमेश याने तिला शोधत भाईंदर येथे गेला मीराला घेऊन तो मित्र शिवचंद्र याच्याकडे गेला. त्या ठिकाणी दोघांनी मीराला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी काहीच ऐकूण घ्यायला तयार नसल्याने तिला घेऊन बोरिवलीतील उद्यानात नेले. तेथे दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कार केल्यानंतर दोघांनी तिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. तशी कबुली त्यांनी पोलिासंना दिली. दरम्यान, काशीमीरा पोलिसांना एका हॉटेलमध्ये वेटरच्या बोलण्यावरून या प्रकरणाचा सुगावा लागला. वेटरच्या सहकार्यामुळे या गुन्हाचा उलगडा झाला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, November 6, 2013, 17:03