Last Updated: Thursday, March 28, 2013, 16:16
www.24taas.com, रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात एका शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही विद्यार्थी नववीची विद्यार्थिनी होती.
शाळेत जात सताना एका अज्ञात व्यक्तिने तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली. या प्रकरणातील नराधम आरोपी हा एका क्रशरवर काम करणारा असल्याचं सांगण्यात येत आहे. हा परिसर दुर्गम आहे. यानंतर पोलिसांना कळवूनही पोलीस ३ तास उशिरा पोहचल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत.
बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना २४ तासांत अटक न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेरवलीच्या ग्रामस्थांनी दिला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण स्थिती आहे.
First Published: Thursday, March 28, 2013, 16:16