Last Updated: Monday, October 28, 2013, 09:57
www.24taas.com, झी मीडिया, दिवेआगररायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्यांनाही ठार मारण्यात आलं होतं.
हे दरोडा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मंदिराच्या पुनर्बांधणीस पानवानगी मिळत नव्हती. मात्र या आधीच सरकारकडून एक कोटी सत्तर लाख मंजूर केले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यानं ग्रामसभा घेण्याची विनंती केलीय. या निर्णयानंतर आज विशेष ग्रामसभा होणार आहे.
त्यामुळं दिवेआगर आणि गणेशभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दिवेआगरच्या पर्यटनाला या निर्णयानं पुन्हा चालना मिळेल असा विश्वास ग्रामस्थांना वाटतोय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 28, 2013, 09:57