‘रिलायन्स’वर मेहेरबानी का?, Reliance on the meherabani?

‘रिलायन्स’वर मेहेरबानी का?

‘रिलायन्स’वर मेहेरबानी का?
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाण्याच्या किसन नगर भागात महापालिकेची परवानगी न घेता रस्ते खोदून रिलायन्स कंपनीकडून केबल टाकण्यात येतेय. पण रिलायन्सच्या ठेकेदारांचं काम काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी बंद पाडलं. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर याची चौकशी करून कारवाई करू, असं उत्तर पालिकेकडून देण्यात आलं.

रिलायन्स कंपन्याच्या ‘फोर जी’ सुविधेसाठी केबल टाकण्याचं काम शहरात जोरात सुरु आहे. यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असतानाही ठेकेदारानं किसन नगर नंबर-३ शिव टेकडी परिसरात रस्त्याचं खोद काम सुरु केलंय. याची दखल स्थानिक नगरसेवक संजय घाडीगावकर यांना घेतली. त्यांनी तिथं जाऊन हे काम बंद पाडलं. नवीन बनलेले रस्ते तीन वर्ष तरी खोदू शकत नाही. मग या कंपनीला खोदकाम करण्यास कोणी परवानगी दिला? असा सवाल घाडीगावकर यांनी उपस्थित केलाय.

पालिका बाकी ठेकेदारांना जसे वागते तसे या ठेकेदारांबरोबर का वागत नाही? असा सवाल उपस्थित झालाय. यामागे मोठं गौडबंगाल असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 12, 2013, 20:04


comments powered by Disqus