डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या बसवर सशस्त्र दरोडा Robbery in bus

डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या बसवर सशस्त्र दरोडा

डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या बसवर सशस्त्र दरोडा
www.24taas.com, झी मीडिया, कर्जत

बसमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबलेल्या बसवर सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या माही जळगावच्या शिवारात असलेल्या कोठारी पेट्रोल पंपावर हैद्राबादहून शिर्डी कडे जाणारी लक्झरी बस डिझेल भरण्यासाठी थांबली होती. नेमक्या त्याचवेळी अंधाराचा फायदा घेत 4 ते 5 दरोडेखोरांनी तलवार, गुप्ती आणि खंजीर यांसारख्या धारदार हत्यारांसह येउन बसवर दरोडा टाकला.

यावेळी बसमधील प्रवाशांना मारहाण करत लुटमार सुरु केली. यावेळी बस मधील प्रवासी आणि दरोडेखोर यांच्यात चांगलीच झटापट झाली. यावेळी आंध्र प्रदेशमधील एका पोलीस कर्मचा-यानं दरोडेखोरांचा प्रतिकार करत त्यांच्याकडील तलवार घेऊन त्यांच्यावरच हल्ला केला. आपल्यावरच प्रतिहल्ला झाल्यानं दरोडेखोरांनी बसमधून धूम ठोकली. परंतु यातील एक आरोपी विठ्ठल शिंदे हा काही अंतरावर जखमी अवस्थेत पडलेला पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


प्रवासी आणि दरोडेखोर यांच्यात झटापट झाल्याने काही प्रवाशी देखील जखमी झाले होते. या जखमी प्रवाशांना मिरजगाव येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आलं. पोलीस इतर फरार दरोदेखोरांचा पोलिस तपास करत आहे.

First Published: Monday, May 6, 2013, 18:56


comments powered by Disqus