Last Updated: Tuesday, April 16, 2013, 21:37
www.24taas.com, मानखुर्दहर्बर मार्गावरील सीएसटी ते पनवेल लोकलवर पहाटे साडेपाच वाजता मानखुर्द ते वाशी दरम्यान दरोडा पडला. मानखुर्द येथे अल्पवयीन मुलांनी हा दरोडा घातला.
मानखुर्द स्थानकावर लगेज डब्यात १४ ते १८ वयोगटातील १० मुले चढली. या मुलांनी डब्यात असलेल्या चार जणांना , धमकावून त्यांच्या कडील १५ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला. त्या नंतर चालत्या ट्रेन मधून लेडीज डब्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलांनी आरडा - ओरडा केल्याने लुटणाऱ्या मुलांपैकी एकाने चेन खेचून लोकल थाबविली.
यात पळून जात असताना अक्षय शिर्के हा सोळा वर्षाचा लुटारू विरुद्ध देशेने जाणाऱ्या लोकलला धडकला आणि मृत पावला. लोकांनी यापैकी पळून जाणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले . आठ जण मात्र पळून गेले. हे सर्व आरोपी मानखुर्द मुन्नाभाई कंपाउंड येथील आहेत.
First Published: Tuesday, April 16, 2013, 21:37