ठाण्यातील एस X 4 बारवर छापा, बारबालांसह ३१ जणांना अटक, S. X 4 bar on police raid in Thane

ठाण्यातील एस X 4 बारवर छापा, बारबालांसह ३१ जणांना अटक

ठाण्यातील एस X 4 बारवर छापा, बारबालांसह ३१ जणांना अटक
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाण्यात मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी रात्री बारवर छापा टाकून धांडगधिंगा घालणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या कारणावरून १८ अल्पवयीन मुलींसह ५६ जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी बारमध्ये काम करणारे सहा वेटर आणि २५ ग्राहकांना पोलिसांनी अटक केली.

ठाण्यातील डायघरमधील एस X 4 या बारमध्ये वेश्या व्यावासाय चालत असल्याची तक्रार इंडिया रेस्कू मिशन या एनजीओच्या माध्यमातून करण्यात आली होती. या एनजीओच्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेने कालरात्री छापा टाकला. यावेळी ५६ जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर ३१ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, एस X 4 नामक बारचा मालकाला पोलिसांनी अटक केलेली नाही.

इंडिया रेस्कू मिशनचे संस्थापक जेम्स वर्गीस यांनी सांगितले की, स्थानीय पुलिसांच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्ठ्या प्रमाणत वेश्या व्यवसाय सूरु आहे. या व्यवसायात अल्पवयीन मुलींना ओढले जात आहे. अशा गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने जेम्स यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कारवाई दरम्यान २३ मुलीना एका छोट्या केबिनमध्ये कोंबून ठेवण्यात आले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 21, 2013, 23:48


comments powered by Disqus