Last Updated: Tuesday, December 17, 2013, 19:55
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेसीनिअर केजीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील एका इंग्रजी शाळेत उघडकीस आली आहे. या शिपायाला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराने घाबरलेल्या पालकांनी सोमवारी मुलांच्या सुरक्षेविषयी शाळा प्रशासनाकडे विचारणा केली.
ठाण्यातील राबोडी परिसरात ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. कौसा, डवले गाव परिसरात राहणारा पीडित विद्यार्थी या शाळेत सीनिअर केजीत शिकतो. मल्लेश तोपन्ना सोनवणे (४०) हा याच शाळेत गेल्या २२ वर्षांपासून शिपाई म्हणून काम करतो.
शुक्रवारी हा विद्यार्थी शाळेत आल्यानंतर मल्लेशने शाळेच्या प्रसाधनगृहात त्याच्यावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर या मुलाला त्रास होऊ लागला, तेव्हा त्याने पालकांना सर्व प्रकार संगितला. त्याच्या पालकांना याप्रकरणी तत्काळ राबोडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवारी तोपन्नाला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, विद्यार्थ्याची वैद्यकीय चाचणी केली असता, त्यात मुलावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 17, 2013, 19:55