गुलाबी थंडीसोबत समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुणे दाखल, SEA GULLS ON RATNAGRI SEAFACE

सी गल्स पाहायचेत, चला कोकणात!

सी गल्स पाहायचेत, चला कोकणात!
www.24taas.com, रत्नागिरी

कोकणात सध्या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. गुलाबी थंडीचा आनंद घेत हे परदेशी पाहुणे समुद्रकिनाऱ्यावर मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरलीय.

कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या असं विहंगम दृश्यं पहायला मिळतंय. थंडीचा हंगाम सुरू झाला की कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर अनेक परदेशी पक्ष्यांचं आगमन होतं. यंदाही रत्नागिरीच्या मालगुंड समुद्र किनाऱ्यांवर सी गल्सचे थवे दाखल झालेत. अरेबियन देशांमधून हे पक्षी कोकणात दाखल होतात. सी गल्सना अतिउष्णता किंवा अतिथंडी मानवत नसल्यामुळे ते दमट हवेच्या ठिकाणी वास्तव्यास येतात. या कालावधीत पिल्लांना जन्म देऊन ते सहकुटुंब साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आपल्या देशात परततात. सी गल्स हा पक्षी कबुतराच्या आकारासारखा असतो. लालसर रंगाची चोच, पंखांवर खरबा रंग असणारा हा पक्षी पाण्यावर तंरगताना बदकाप्रमाणे भासतो.

कोकण किनारपट्टीवरील सी गल्सचं हे सुंदर दृष्य पर्यटकांनाही खुणावतंय. त्यांनी परदेशा पाहुण्यांच्या आगमनाचा आनंद नक्कीच घ्यायला हवा.

First Published: Wednesday, November 28, 2012, 09:15


comments powered by Disqus