Last Updated: Saturday, April 13, 2013, 21:16
www.24taas.com, ठाणेइमारत दुर्घटना प्रकरणानंतर पालिकेकडून करण्यात येणाऱ्या अनअधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही त्यांच्या पक्षातील आमदारांचे कान टोचले आहेत. अनअधिकृत बांधकामांवरील कारवाई झालीच पाहिजे. असा ठाम मत व्यक्त केलं.
शरद पवार यांनी असं वक्तव्य करीत असतानाच नेत्यांनाही खडे बोल सुनावले आहेत. अनधिकृत बांधकामांवर करीत असाताना अगोदर नेत्यांची बांधकामे पाडा असा सल्ला शरद पवारांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. त्याच वेळी अनधिकृत इमारतींची संख्या मोठी असल्यानं त्यावर कारवाई करण्यापूर्वी तिथल्या लोकांचं योग्य पुनर्वसन व्हायला हवं, असं सांगत पवारांनी आव्हाड यांच्या भूमिकेलाच समर्थन दिलं आहे...
First Published: Saturday, April 13, 2013, 21:16