Last Updated: Wednesday, October 23, 2013, 15:22
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेफेसबुक ट्विटरवर रमणा-या सध्याच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राशी ओळख व्हावी, त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी ठाण्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जीवनगौरव या संस्थेनं शिवगौरव महोत्सवाचं आयोजन केले आहे.
राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ आणि छत्रपती शिवाजी महराज क्रीडा मंडळ यांच्या सहयोगाने हा महोत्सव ठाण्यातील सेंट्रल मैदानात २६ व २७ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यावेळी अनेकविध कार्यक्रम पार पडणार आहेत. २६ रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, किल्ले प्रदर्शन, दांडपट्टा प्रात्यक्षिके शिवकालीन दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन ही असणार आहे. असा हा भरगच्च कार्याकामांचा ऐतिहासिक खजिना नागरिकांसाठी विनामुल्य खुला असणार आहे. त्यातही खास वैशिष्ट्य म्हणजे अनेक दिवसांनी लता मंगेशकर, ह्दयनाथ मंगेशकर व आशा भोसले हे मंगेशकर कुटुंबिय ठाण्यात येणार आहेत.
तसेच बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन व अनुभव ही ऐकण्यास मिळणार आहे. यावेळी युवकांसाठी एका महत्वाच्या इतिहासाची ओळख जवळून बघायला मिळणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Wednesday, October 23, 2013, 13:10