Last Updated: Thursday, April 18, 2013, 08:06
www.24taas.com, ठाणेअनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. शहरातल्या तलावपाळी भागात मध्यरात्री 6 TMT बसेसची तोडफोड करण्यात आली आहे.
खोपट ST स्टॅंडवरील काही बसेसची तोडफोड करण्यात आलीय. ठाण्यातले राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेनेचे दिग्गज नेते मध्यरात्रीपासून आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. हा बंद यशस्वी व्हावा यासाठी या पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येते.
सामान्य ठाणेकर मात्र नाहक वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे. ठाण्यात आज पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये भाजप आणि मनसे हे पक्ष सहभागी झालेले नाहीत.
First Published: Thursday, April 18, 2013, 08:05