Last Updated: Monday, January 21, 2013, 18:54
www.24taas.com, कल्याणमाजी कामगारमंत्री आणि शिवसेना नेते साबीर भाई शेख यांना अखेर औरंगाबादच्या वृद्धाश्रमात हलवण्यात आलंय.
काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांनी साबीरभाई शेख कसे विपन्नावस्थेत जीवन जगताहेत, याची बातमी दाखवली होती. त्यावेळी काही जणांनी थोडीफार मदत केली. मात्र पुन्हा त्यांची दयनीय अवस्था झाल्यानं औरंगाबादच्या `कल्पतरू` या संस्थेनं त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांना कल्याण जवळील त्यांच्या कोनेगावच्या घरातून औरंगाबादच्या ‘मातोश्री वृद्धाश्रम’ येथे नेण्यात आलं.
मात्र, साबीरभाईंना निरोप देण्यासाठी सेनेचा एकही कार्यकर्ता किंवा नेता उपस्थित नसल्यानं, साबीरभाईंच्या शेजा-यांनी नाराजी व्यक्त केलीय.
First Published: Monday, January 21, 2013, 18:51