वृद्ध कर्मचाऱ्याला मारहाणः मनसे नगरसेवकाला अटक, Slapping row: MNS corporator arrested, granted bail

वृद्ध कर्मचाऱ्याला मारहाणः मनसे नगरसेवकाला अटक

वृद्ध कर्मचाऱ्याला मारहाणः मनसे नगरसेवकाला अटक
www.24taas.com, कल्याण

ठेकेदाराच्या वृद्ध कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी कल्याण- डोंबिवलीचे मनसे नगरसेवक नितीन निकम यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, निकम यांना कोर्टाने जामीनही दिला आहे.

मारहाणप्रकरणी निकम यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं.. निकम यांनी ठेकेदाराच्या कर्मचा-याला पाईपलाईन लिकेजवरून श्रीमुखात लगावली होती

कल्याण पूर्व भागातल्या सिद्धार्थनगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली म्हणून ठेकेदाराला मारहाण केली करण्यात आली होती. सर्वांसमोर निकम या नगरसेवकांनं ठेकेदाराच्या सात ते आठवेळा श्रीमुखात भडकावली. दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांकडून या मारहाणीचं समर्थन करण्यात आले होते.

संतापाच्या भरात लोकप्रतिनिधी कोणत्या थराला जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण कल्याण-डोंबिवली महापालिकेत पाहायला मिळालं. मुळात पाईपलाईन फुटली म्हणून ठेकेदाराला मारहाण करण्याचा अधिकार नगरसेवकांना कुणी दिला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या मारहाण प्रकरणी निकम यांची कोर्टाकडून सुटका झाली असली तरी मनसेचे वरिष्ठ नेते काही कारवाई करेल, याकडेच सर्वांचं लक्ष लागलय.

First Published: Monday, December 3, 2012, 17:31


comments powered by Disqus