Last Updated: Thursday, March 27, 2014, 15:44
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईगुढी पाडवानिमित्ताने कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर आहे. या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावेल.
ही विशेष गाडी २९ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी सीएसटी ते मडगाव दरम्यान धावेल. ०१००५ सीएसटी-मडगाव ही गाडी रात्री १२.२० मिनिटाने सुटेल. ती मडगावला दुपारी १२.४० वाजता पोहोचेल. तर ०१००६ मडगावहून सीएसटीसाठी ही गाडी दुपारी १.३० वाजता सुटेल. ती सीएसटीला रात्री १.५५ पोहोचेल.
या विशेष गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविंम या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला २३ डबे जोडण्यात आले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 27, 2014, 15:40