Last Updated: Tuesday, September 25, 2012, 15:52
www.24taas.com, नवी मुंबईनवी मुंबई परिवहन सेवेनं आजपासून भाडेवाढ लागू केलीय. एन.एम. एम.टी ला दर महिन्याला 1 कोटी 47 लाखांचा तोटा होतोय. हा तोटा भरण्यासाठी, तसंच डिझेलचे दर वाढल्याने ही भाडेवाढ केली असल्याचं परिवहन तर्फे सांगण्यात येतंय.
नवी मुंबई परिवहन 336 बस उपलब्ध असून त्यातील 240 ते 245 बस कार्यरत आहेत , त्यातील 145 डीझेलवर तर 161 बसेस सीनजी वर चालतात. मुंबई, ठाणे , बदलापूर , कल्याण , उरण , पनवेल पर्यंत या बसेस धावतात.
भाडेवाढीमुळे या बसेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या खिशाला चाट बसणारय. प्रवाशांनी या दरवाढीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
First Published: Tuesday, September 25, 2012, 15:52