खोपोलीला वादळाचा तडाखा, Strong storm in Khopoli

खोपोलीला वादळाचा तडाखा

खोपोलीला वादळाचा तडाखा
www.24taas.com,खोपोली

खोपोली परीसराला जोरदार पावसासह चक्री वादळाने झोडपून काढलं. चक्री वादळानं इंथल्या झेनिथ कंपनीचं प्रचंड नुकसान केलंय. तसचे नागरिकांच्या घरावरील पत्रे, कौले उडून गेल्यानं त्याचही मोठ नुकसान झालंय.

शहरातील साईबाबा नगर,विहारी, रहातावडे, मोगल वाडी ,ताकई ,प्रकाश नगर इत्यादी भागाला वादळाचा फडका बसलाय. वीजेच्या तारा तुडल्या आणि लोखंडी खांब वाकल्यानं वीज पुरवठा काही काळ बंद होता.

दरम्यान महसूल यंत्रणेनं नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून पंचनामे केलेत. नुकसान झालेल्या लोकांना तातडीन शासकीय मदत मिळावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

First Published: Sunday, October 28, 2012, 22:01


comments powered by Disqus