साखर कारखान्यांनी केला गळीत हंगामाचा शुभारंभ , sugar factories crushing season

साखर कारखान्यांनी केला गळीत हंगामाचा शुभारंभ

साखर कारखान्यांनी केला गळीत हंगामाचा शुभारंभ
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

राज्यातील जवळपास सगळ्याचं साखऱ कारखान्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. पण कोणत्याच साखर कारखान्याने उसाला पहिली उचल किती देणार हे अजुन जाहीर केलेलं नाही..त्यामुळं उस दराबाबात राज्यात तिढा निर्माण झालाय. त्यामुळं आता 8 नोव्हेंबरला होणा-या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्याकडे सर्वांच लक्ष लागलंय़.

यंदाच्या हंगामामध्ये तुटणा-या उसाला पहिली उचल 3500 हजारापेक्षा जास्त दर मिळाली पाहीजे अशी भुमीका शेतकरी संघटनांनी घेतलीय. पण हा दर देणं शक्य नसल्याचं सांगत हा तिढा सुटेपर्यंत उसाचं गाळप सुरु न करण्याचा निर्णय अनेक कारखान्यानी घेतलाय. कारखानदार ठाम असताना शेतकरी संघटनाही आपल्या मागण्यांबाबत तितक-याच आग्रही आहेत. त्यामुळं आता राज्यातील उस उत्पादक शेतकरी आणि काऱखानदारांचे लक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणा-या उस परिषदेकडं लागलंय.

आमच्या घामाचा पैसा मिळविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतक-यांनी घेतलीय. एकीकडं राज्यातील अनेक साखर कारखाने शॉर्ट मार्जीनमध्ये आहेत. त्यात साखरेचे दर प्रतिक्वीटंल 3400 रुपयावरुन 2640 रुपयांवर खाली आलेत, त्यामुळं उसाला पहिली उचल 3500 हजार देणं कारखान्यांना जमणार नाही असं कारखाना प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात येतय. त्यामुळं यंदाचा गळीत हंगाम देखील उस दरावरुन गाजणार हे नक्की.

दरम्यान, साखरेचे दर उतरण्यास राज्यातल्या आणि केंद्रातील नेत्याचा काळा पैसा कारणीभूत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय. उस उत्पादाकाना कमी दर देण्यासाठी साखर कारखानदार व राजकीय नेत्यांनी ही कोंडी केल्याचा दावा त्यांनी केलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 6, 2013, 21:43


comments powered by Disqus