Last Updated: Thursday, August 22, 2013, 08:49
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेउल्हासनगरच्या मध्यवर्थी पोलीस ठाण्यातील हवालदार आनंद पाटील यांची पत्नी पद्मिनी पाटील यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
घरगुती भांडणातून पद्मिनी यांनी स्वतःला जाळून घेतलं. यात पद्मिनी पाटील या ९९ टक्के जळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पद्मिनी ही आनंद पाटील याची दुसरी पत्नी आहे. या आत्महत्येच्या वेळी आनंद पाटील हे घरीच होते. आपल्या बहिणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली असल्याचा आरोप पद्मानि पाटील यांच्या बहीणीने केलाय.
या घटनेची उल्हासनगर पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोद केली असली तरी हिं हत्या आहे का आत्महत्या याचा पोलिस शोध घेत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 22, 2013, 08:47