कोकण रेल्वेमार्गावर सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन, NEW LTT-KOCHUVELI TRAIN VIA KONKAN RAILWAY ROUTE

कोकण रेल्वेमार्गावर सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन

कोकण रेल्वेमार्गावर सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या गाडीला २४ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरू हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे.

रेल्वेच्या मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली अशी ही एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावेल. या गाडीला दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून हिरवा कंदील रेल्वमंत्री दाखवतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली ही एक्सप्रेस दि. २७ जानेवारी २०१४पासून नियमित सुरू होईल. २२११३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेलील ही एक्सप्रेस मंगळवार आणि शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल. तर मुंबईच्या परतीसाठी कोचुवेलीतून २२११४ कोचुवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही एक्सप्रेस दर गुरूवारी आणि सोमवारी सुटेल.
या एक्सप्रेसला ठाणे , पनवेल , चिपळूण , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , पेरनेम, मडगाव , कारवार, उडुपी , मंगलोर जंक्शन, कसरगोड, कन्नौर , थल्लासेरी, कोझीकोड, तिरुर, शोरानूर , त्रिशूर , एर्नाकुलम टाउन , कोट्टायम , तिरुवल्ला , कोट्टायम , तिरुवल्ला , चेंगन्नुर आणि कोल्लम या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

ही एक्स्प्रेस सायंकाळी ४.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी कोचुवेलीला रात्री ८.३० पोहोचेल. तर कोचुवलीतून ही गाडी रात्री १२.३५ वाजता सुटेल ती लोकमान्य टिळक टर्मिनसला सायंकाळी ४.१० वाजता पोहोचेल. या एक्स्प्रेसला १७ डबे असणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 22, 2014, 15:10


comments powered by Disqus