शाळेनेच केले जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत, SVPM school Boycott Students in chiplun

शाळेनेच केले जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत

शाळेनेच केले जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधल्या एसव्हीपीएम शाळेत जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत करण्याचा धक्कादायक प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात मुलाच्या पालकांनी आमरण उपोषण सुरु केलंय.

पुरोगामी महाराष्ट्रातही जातीयत कशा प्रकारे जिवंत आहे हे पाहणारा पाहूया एक विशेष रिपोर्ट. चिपळूणमधल्या SVPM शाळेत जातीच्या अधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत केल्याचं उदाहरण समोर आलंय.या शाळेत नववीत शिकणा-या विद्यार्थ्याला विशिष्ट जातीत असल्याच्या कारणावरुन गेल्या सहा महिन्यांपासून बेंचऐवजी ऐवजी लाकडी खुर्चीत बसविण्यात येतंय.

शाळेत मिळणाऱ्या या वागणुकीमुळे हा विद्यार्थी पार खचलाय. इतकंच नाही तर शाळा प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असल्यानं या विद्यार्थ्याच्या पालकांनी आमरण उपोषण सुरु केलंय. या प्रकरणात पालकांच्या तक्रारीनंतर उपशिक्षण गट विकास अधिकाऱ्यांनी त्या शिक्षिकेवर कारवाईचे आदेश दिलेत. तर या प्रकरणात कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ अशी सावध भूमिका शाळेनं घेतलीय.

पुरोगामी महाराष्ट्राचे ढोल जाता येता बडवणा-या आपल्या राज्यात जातीयता आजही जिवंत आहे. शाळेतल्या विद्यार्थ्याला जातीच्या अधारावर बहिष्कृत करणाऱ्या या शिक्षिकेवर कठोर कारवाईसाठी प्रशासन कधी पुढं येणार हा प्रश्न कायम आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, December 19, 2013, 21:55


comments powered by Disqus