पर्यटकांनो सावधान! माथेरानमध्ये टॅक्सीवाल्यांकडून लूट Taxi drivers in matheran

पर्यटकांनो सावधान! माथेरानमध्ये होतेय लूट

पर्यटकांनो सावधान! माथेरानमध्ये होतेय लूट
www.24taas.com, माथेरान

थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं माथेरान पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतं. माथेरानची मिनीट्रेन आणि माथेराननं जपलेलं गावपण ही पर्यटकांची मुख्य आकर्षणं... मात्र आता इथं येणा-या पर्यटकांना टॅक्सीवाल्यांकडून लुबाडण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे माथेरानला जाणा-या पर्यटकांना आता सावध रहावं लागणार आहे...

थंड हवा..प्रसन्न वातावरण... डोंगर कपारीचा आडोसा घेत जाणारी मिनी ट्रेन... धावपळीच्या जीवनातही जपलेलं गावपण आणि शांतता... यामुळेच पर्यटकांची पावले आपसुकच माथेरानकडे वळतात. पण इथल्या टॅक्सी संघटनेच्या मुजोरीचा फटका रत्नागिरीतल्या काही पर्यटकांना आलाय.

मांडवी गावाच्या जय भैरव उत्सव मंडळाचे काही सदस्य कोकण दर्शनातून माथेरानला पोहोचले. मोठी वाहने वर नेता येत नाहीत या कारणावरून या पर्यटकांच्या बसेस इथल्या टॅक्सीवाल्यांनी अडवून धरल्या आणि टॅक्सीमधून जाण्याची सक्ती करू लागले. यादरम्यान टॅक्सीवाल्यांनी या पर्यटकांना धमक्याही दिल्या.


सुरक्षेच्या दृष्टीने जरी टॅक्सीवाल्यांचं म्हणणे योग्य असलं तरी त्यांनी या पर्यटकांना ज्या पद्धतीने धमकाविले ते चुकीचं आहे. मोठ्या अवजड वाहनांसाठी डोंगरपायथ्याशी कोणतीही पार्किंगची सोय नसल्यानं असे प्रसंग वारंवर घडत असल्याचं इथल्या माजी नगराध्यक्षांनी सांगितलं.

अशा प्रसंगांतून माथेरानला येणारा पर्यटक दुखावला तर त्याचा फटका पर्यटक व्यवसायावर होणार असून त्यात टॅक्सीवाल्यांच्या धंद्यावरही प्रतिकूल परिणाम होणार यात शंका नाही..

First Published: Sunday, February 24, 2013, 20:59


comments powered by Disqus