प्राध्यापकानेच केला विद्यार्थींनीवर अनेकदा बलात्कार, teacher rape on student

प्राध्यापकानेच केला विद्यार्थींनीवर अनेकदा बलात्कार

प्राध्यापकानेच केला विद्यार्थींनीवर अनेकदा बलात्कार
www.24taas.com, मुंबई

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना कल्याणमध्ये घटलीय. एका महाविद्यालयात शिकणा-या तरूणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर सतत बलात्कार करणा-या नराधम प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केली.

सुनील यादव अस प्राध्यापकाचं नाव असून तो कल्याणमधील सेठ हिराचंद मुथा महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवतो. याच महाविद्यालयात शिकणा-या एका युवतील्या त्याने आपल्या प्रेमात फसवलं आणि तिला लग्नाच आमिषही दिलं. मात्र युवतीने यादवपुढे लग्नाचा तगादा लावला.

यादवने अनेकवेळा तिला मारहाण करून शिवीगाळ केली. यादव तिला अधिक मारहाण करायला लागल्यानं तीन पोलीस स्टेशन गाठून यादव विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या सुनील यादवला अटक केली.

First Published: Saturday, March 23, 2013, 23:24


comments powered by Disqus