Last Updated: Thursday, December 1, 2011, 12:00
झी २४ तास वेब टीम, वसई 
वसईत सावकारी कर्जातून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. तुलसीराम यादव असं या रिक्षाचालकाचं नाव असून, झेंडाबाजार परिसरात या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. लाकडी बांबू, सळईनं तुलसीरामला मारहाण करण्यात आली. तुलसीरामनं रिक्षासाठी खाजगी सावकाराकडून १ लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, मात्र या कर्जाची परतफेड तुलसीराम करु न शकल्यानं, त्याला मारहाण केल्याचं तुलसीरामला सांगण्यात आलं.
मात्र सर्व पैसे सावकाराला परत केल्याचं तुलसीरामचं म्हणणं आहे. नरेंद्र भोईर या सावकाराकडून तुलसीरामनं कर्ज घेतलं होतं. या भोईरचे साथीदार हेमंत आणि गणेश या दोघांनीच मारहाण केल्याचं तुलसीरामचं म्हणण आहे. यानंतर रिक्षआचालकानं वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.
First Published: Thursday, December 1, 2011, 12:00