अंबरनाथमध्ये मनसे पॅटर्न संपुष्टात - Marathi News 24taas.com

अंबरनाथमध्ये मनसे पॅटर्न संपुष्टात

www.24taas.com, अंबरनाथ
 
अंबरनाथमध्ये आज मनसे पॅटर्न संपुष्टात आलाय. सेनेला कामाच्या मुद्यावर पाठींबा देणाऱ्या मनसेच्या ६ नगर सेवकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला सभापती निवडणुकीत पाठिबा दिला. त्यामुळे आत्ता आघाडीचे २६ तर युतीचे आणि अपक्ष मिळून २४ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे.
 
 
यातही सेनेचा पंढरीनाथ वारीगे हा नगरसेवक ठाण्यातील तुरुंगात आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये सेनेने १७ वर्ष राखलेली सत्ता संपुष्टात आली आहे. ठाणे आणि इतर ठिकाणी मनसे सेना वादामुळे इतकच नाही तर उद्धव आणि राज यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे मनसेने आज सेनेला धक्का दिल्याचे बोलले जात आहे .
 

First Published: Wednesday, May 16, 2012, 16:59


comments powered by Disqus