रोडरोमिओचा हल्ला - Marathi News 24taas.com

रोडरोमिओचा हल्ला

झी २४ तास वेब टीम, डोंबिवली
 
डोंबिवलीत राहणाऱ्या बिपीन दनानी यांना आपला एक बोट कायमचा गमवावा लागला आहे. रोडरोमियोला केलेल्या प्रतिकारामुळं त्यांना आपलं एक बोट गमवावं लागलं. पत्नीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला ध़डा शिकविण्यासाठी गेलेल्या बिपीन यांना आरोपीने मारहाण करत त्यांचा बोटाला चावा घेतला आणि घटनास्थळावरुन पोबारा केला.
 
बिपीन यांच्या पत्नी कविता यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी त्या आपल्या दुकानात जात होत्या.त्याच दरम्यान आरोपीने त्यांना रस्त्यात गाठलं. भररस्त्यात छेड काढणा-या रोडरोमियोपासून आपला बचाव करत त्या आपल्या दुकानात पोहचल्या आणि त्यांनी त्यांच्यावर बेतलेल्या त्या प्रसंगाबद्दल आपल्या पतीला सांगितलं. पत्नीची छेड काढल्यामुळे बिपीन यांनी आरोपीला जाब विचारला असता त्यांनी बिपीन यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्यात हाणामारी झाली. आरोपीने बिपीन यांच्या बोटाचा चावा घेऊन घटनास्थळावरून पळून गेला.
बिपीन यांना आपलं बोट कायमचं गमवावं लागलं आहे.याप्रकऱणी पोलिसानी गुन्हा दाखल केला असून पोलीस आता फरार आरोपीचा शोध घेत आहेत.मात्र भरदिवसा गजबजलेल्या परिसरात महिलेची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंच्या या कृत्यामुळं नागरिकांध्ये दहशत पसरलीय.

First Published: Thursday, December 1, 2011, 06:40


comments powered by Disqus