दक्ष नागरिकांनी पकडले चोर - Marathi News 24taas.com

दक्ष नागरिकांनी पकडले चोर

झी 24 तास वेब टीम, कल्याण
 
कल्याणमध्ये राहणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी दोन बॅग लिफ्टरला मोठ्या शिताफीने पकडलंय. कल्याणच्या सहजानंद चौकात हा प्रकार घडला. सहजानंद चौकातील महावीर कॉम्प्लेक्समध्ये काम करणाऱ्या महेश वर्मा यांना या लुटारूंनी सावज केलं होतं. घटनेच्या दिवशी महेश वर्मा हे त्यांची कलेक्शन केलेली एक लाख 45 हजार रुपयांनी भरलेली बॅग घेऊन ऑफिसमध्ये जात होते. त्याच दरम्यान चौघाजणांनी त्यांना वाटेतच अडवून त्यांच्याजवळील बॅग हिसकावली. आणि ते पसार झाले. मात्र काही दक्ष नागरिकांनी या चोरांचा पाठलाग केला आणि त्या चौघा चोरापैकी दोघे हे नागरिकांच्या हाती लागले.
 

दक्ष नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महेश वर्मा यांची रोकड शाबूत राहिली. यातील दोघा आरोपींना पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय.कल्याणच्या गजबजलेल्या सहजानंद चौकात भरदिवसा हा लुटीचा प्रकार घडल्याने स्थानिकामध्ये भीतीचं वातावरण पसरलय.

First Published: Thursday, December 1, 2011, 10:40


comments powered by Disqus