Last Updated: Friday, May 18, 2012, 21:33
www.24taas.com, कल्याण 
भिवंडीत वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये दारु प्यायलेल्या तीन युवकांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या सुभाष चौकात ही घटना घडली.
शांताराम कसबे असं मारहाण झालेल्या पोलिसाचं नाव आहे. याप्रकरणी सुमित वाघमारे त्याचा भाऊ सचिन वाघमारे याला अटक झाली आहे. त्यांच्या एका साथीदारानं मात्र घटनास्थळावरुन पळ काढला. मद्यपी युवकांनी सुभाष चौक परिसरात उभ्या असलेल्या एका वॅगेन आर गाडीला ठोकर मारल्यानंतर रस्त्यावर चाललेल्या एका महिलेला ठोकर मारली.
ड्युटीवरील वाहतूक पोलिस कसबे यांनी मद्यपी त्रिकुटाला अडवण्याचा प्रयत्न केला. पण या त्रिकुटानं त्यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तेव्हा इतर पोलीस आणि नागरिकांनी सुमित आणि त्याचा भाऊ सचिनला पकडलं.
First Published: Friday, May 18, 2012, 21:33