मालमत्ता करप्रणाली चुकीची घटनाविरोधी? - Marathi News 24taas.com

मालमत्ता करप्रणाली चुकीची घटनाविरोधी?

www.24taas.com, ठाणे
 
मुंबई आणि ठाणे महापालिकेनं भांडवली मुल्यावर आधारीत लागू करण्यात येणाऱ्या मालमत्ता करप्रणाली विरोधात धर्मराज्य पक्षाचे सचिव राजेंद्र फणसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर १४ जूनला सुनावणी होणार आहे.
 
ही करप्रणाली चुकीची आणि घटनाविरोधी असून आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केवळ पैसा जमा करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि महापालिकेनं आपल्या सोयीप्रमाणं ही करप्रणाली तयार केली असल्याचं फणसेंनी म्हटलं आहे.
 
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुथ्थान योजनेनुसार शहर पातळीवरील मालमत्ता करप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे तसंच सात ते आठ वर्षांपासूनची मुंबई आणि ठाणे महापालिकेनं ८५ टक्के वसुली वर्षभरात करावी यासाठी धर्मराज्य पक्षाचे सचिव राजेंद्र फणसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
 
 
 

First Published: Friday, May 18, 2012, 22:30


comments powered by Disqus