डॉक्टरच्या निष्काळजीने महिलेचा बळी - Marathi News 24taas.com

डॉक्टरच्या निष्काळजीने महिलेचा बळी

झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका 21 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ठाणे जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात घडली आहे.
 
मिताली पाटील असं या दुर्देवी महिलेचं नाव असून कुडूसच्या मानस हॉस्पिटलमध्ये तिला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं होतं होतं. मात्र प्रसुतीनंतर तिचा मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मिताली पाटीलच्या नातेवाईकांनी केलाय.मनीष चंद्रकांत पाटील असं या हॉस्पिटलच्या डॉक्टरचं नाव आहे.
 
विशेष म्हणजे या डॉक्टरच्या नावामागे BAMS, DGO अशी पदवी आहे. MBBS झाल्याशिवाय DGO ही पदवी घेता येत नाही अशी माहिती आहे. तसच BAMS डॉक्टरला शस्त्रक्रियेची परवानगी नसतांनाही त्यांनी ती केल्यानं या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी होतीय.

First Published: Friday, December 2, 2011, 06:35


comments powered by Disqus