पत्नीनं पतीला जाळले - Marathi News 24taas.com

पत्नीनं पतीला जाळले


झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीची जाळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडलाय.
 
राजू तिवारी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. कल्याणमध्ये कोळसेवाडी परिसरात राहणा-या तिवारी दाम्पत्याचा ५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण राजूच्या पत्नीचे तिच्याच दिराशी अनैतीक संबंध होते. याची माहिती राजूला कळाल्याचं लक्षात येताच बिट्टी तिवारी आणि तिचा प्रियकर शिवशंकर तिवारी यांनी दोघांनी राजूला रॉकेल टाकून पेटवून दिलं.
 
 
राजूचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. पण या सर्व प्रकारात राजूची दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. कारण या घटनेनंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी बिट्टी तिवारी आणि तिचा प्रियकर शिवशंकर या दोघांनाही अटक केली आहे.

First Published: Friday, December 2, 2011, 08:37


comments powered by Disqus