Last Updated: Thursday, May 24, 2012, 22:36
www.24taas.com, अंबरनाथ 
अंबरनाथमधील आंनदनगर भागात कुल कॅब कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत कारचालक जागीच ठार झाला तर बस मधील २४ प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमी प्रवाशांमध्ये १३ महिला असून त्यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. मे. डी के कंपनीची बस २४ कर्मचाऱ्यांना घेऊन अंबरनाथाच्या दिशेने निघाली होती.
या वेळी समोरून येणाऱ्या कुल कॅबकारला बसने जोरदार धडक दिली. यात कारचा चालक पांडुरंग जाधव याचा जागीच मृत्यू झाला. बसचालक अर्जुन पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.
First Published: Thursday, May 24, 2012, 22:36