वसईत भीषण अपघात, ३ ठार - Marathi News 24taas.com

वसईत भीषण अपघात, ३ ठार

www.24taas.com, वसई
 
वसईत ट्रक आणि इंडिका कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. वसईच्या सातिवली खिंडीत बाफणा परिसरातून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला.
 
त्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक इंडिका कारवर आदळला. प्रितेश देसाई, निजामअली मकवाना आणि शशिकांत राठोड अशी मृतांची नावं आहेत. सुभाष पवार या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अपघात हा फारच भीषण होता. त्यामुळे या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
 
 
 

First Published: Sunday, May 27, 2012, 12:08


comments powered by Disqus