शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात - Marathi News 24taas.com

शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरूवात

www.24taas.com, अलिबाग
 
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३८ वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथी नुसार आज मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. देशाच्या कानाकोप-यातून हजारो शिवभक्तांनी किल्ले रायगडावरगर्दी केली आहे.
 
शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती व रायगड जिल्हा परिषद यांच्या वतीने पारंपारिक वेशभुषा मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं तसंच पालखी मिरवणूक आदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. याच बरोबर शाहिरी पोवाडे, शिवचरित्र गायन असा भरगच्च कार्यक्रम आहे.
 
रायगडावरील शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी १२५ किलोचं पंचधातुचं छत्र बसवलंय. केंद्राच्या पुरातत्व खात्यानं परवानगी नाकारूनही शिवप्रतिष्ठान संस्थेचे आणि खासदार उदयन राजेंच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींनी छत्र बसवले आहे.
 
व्हिडिओ पाहा..
 

First Published: Saturday, June 2, 2012, 09:09


comments powered by Disqus