मध्य रेल्वेची विस्कळीत सेवा सुरळीत - Marathi News 24taas.com

मध्य रेल्वेची विस्कळीत सेवा सुरळीत

www.24taas.com, कल्याण
 
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे. २० ते ३० मिनिटांना रेल्वे गाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल झालेत.
 
कल्याण कसारा मार्गावरील खर्डी रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचं इंजिन फेल झाल्याने ही मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळं कसारा खर्डी वाहतूक ठप्प झाली होती. तर पुष्पक आणि गुवाहटी एक्स्प्रेस थांबवण्यात आली होती. सकाळी सव्वानऊ पासून लोकल वाहतूक ठप्प झाली होती.
 
मालगाडीचे इंजिन बाजूला केल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पुन्ही सुरू झाली आहे. दरम्यान, फास्ट गाड्या सुरू होत्या तर स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. या मार्गावरील गाड्या ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.
 
व्हिडिओ पाहा..
 

First Published: Saturday, June 2, 2012, 14:58


comments powered by Disqus