मुरबाड वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, २ ठार - Marathi News 24taas.com

मुरबाड वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, २ ठार

www.24taas.com, मुरबाड
 
मुरबाडजवळ वांजळेगावाजवळ भीषण अपघात झाला आहे. शहापूर तालुक्यातील असनोलीहून अंबरनाथला लग्नासाठी निघालेल्या व्हराडाची सुमो झाडावर आदळली. यामध्ये वैभव सोनावळे आणि गाडीचा चालक योगेश चनाने जागीच ठार झाले.
 
तर इतर ९ जखमी झाले. जखमींना कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी ६ जणांची तब्बेत चिंताजनक आहे. घनघाव कुटुंबियांचे व्हराड घेऊन ही बस चालली होती. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं आहे.
 
मात्र या मार्गावरील रस्ते खराब असल्यानेही येथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामुळे खराब रस्ते हे अपघाताला कारणीभूत असल्याचे स्थानिकाचं म्हणणं आहे.
 
 
 

First Published: Sunday, June 3, 2012, 23:26


comments powered by Disqus