Last Updated: Wednesday, June 6, 2012, 12:15
www.24taas.com, रायगड 
रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कडक संरक्षण देण्यात आलं आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीला संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतलेला आहे.
तो हटवण्यासाठी २०१२ पूर्वीची डेडलाईन दिली होती. त्या पार्श्वभूमीवर वाघ्या कुत्र्याच्या समाधीशेजारी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रायगडावर शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडने काही गडबड करू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा रायगडावर तैनात करण्यात आला होता.
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३८ वा शिवराज्याभिषेक तारखेनुसार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं रायगडावर आज या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
First Published: Wednesday, June 6, 2012, 12:15