Last Updated: Thursday, June 7, 2012, 13:40
www.24taas.com, ठाणे 
ठाणे महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केली.
त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. भरत चव्हाण यांच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांचं पथक गेलं होतं.
त्यावेळी या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसंच पथकावर दगडफेकही करण्यात आली. अखेर पोलिसांना लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी.
First Published: Thursday, June 7, 2012, 13:40