Last Updated: Thursday, June 7, 2012, 16:17
www.24taas.com, ठाणे ठाण्यातल्या राजकीय पक्षांनी अनधिकृतरित्या थाटलेली कार्यालये काढण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला सर्वपक्षीय विरोध वाढू लागला आहे. अतिक्रमण काढण्याच्या भितीनं कोपरी भागातल्या काँग्रेसच्या कार्यालयात होमहवनचे आयोजन करण्यात आलं आहे.

आणि विशेष म्हणजे काँग्रेसच्या मदतीला शिवसेनाही धावली आहे. याठिकाणी शिवसेनेचे ३ आमदारही उपस्थित आहेत. त्यामुळे आता सक्षम कारवाई करण्यापेक्षा काँग्रेस होमहवनातच मग्न आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे ३ आमदारही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने आता या होमहवन कार्यक्रमाबाबत मात्र चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
First Published: Thursday, June 7, 2012, 16:17