Last Updated: Monday, June 18, 2012, 13:22
www.24taas.com, वसई सुसरी धरण विरोधी संघर्ष समितीने वसई-विरार शहर महानगपालिकवर मोर्चा काढला होता. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी सुसरी धरणाला विरोध असल्याचं सांगून घोषणाबाजी केलीय.
वसई विरार शहराला पाणी पुरवठा वाढवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सूर्या नदीवर हे धरण बांधण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. डहाणूच्या रानशेत गावाजवळ हे धरण बांधण्यात येणार आहे.
या धरणामुळे 13 पाडे आणि 3 हजार 500 लोकांचं स्थलांत्तर करावं लागणार असल्यानं ग्रामस्थांनी या धरणास विरोध केलाय. तर दुसरीकडे या धरणामुळे वसई विरार या शहराची पाण्याची गरज कायमची भागणार आहे.
First Published: Monday, June 18, 2012, 13:22