हुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या - Marathi News 24taas.com

हुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या

www.24taas.com, डोंबिवली
 
डोंबिवलीत उच्च शिक्षित नवविवाहितेनं हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून आत्महत्या केली. जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस असलेल्या वृशाली गावडे या २९ वर्षीय विवाहितेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी पती जयेश गावडे आणि सासू शशिकला यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करुन जयेशला अटक केलीय. आत्महत्येपूर्वी वृशालीनं सुसाईड नोट लिहीली आहे. जयेश हा शेअर मार्केटमध्ये मोठ्या हुद्यावर काम करतोय. विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वीच जयेश आणि वृशालीचा प्रेमविवाह झाला होता. वृशालीच्या कुटुंबियांनी जयेशनेच वृशालीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
 
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर याबाबत सत्य कळेल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.डोंबिवलीतील तुकाराम नगरमधील श्रीसागर अपार्टमेंटमध्ये वृषाली पती आणि सासूसोबत राहत होती. वृषालीचा मुंबईतील फ्लॅट आणि एक लाखांचं फिक्स डिपॉझीट स्वतः च्या नावावर करण्यासाठी पतीकडून वृषालीचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता, असा आरोप आहे.
 
व्हिडिओ पाहा..

 

 

First Published: Wednesday, June 20, 2012, 09:07


comments powered by Disqus