ठाण्यात दुधाची भेसळ - Marathi News 24taas.com

ठाण्यात दुधाची भेसळ

www.24taas.com, ठाण्यात
 
मुंबई, नवी मुंबई, पुण्यापाठोपाठ आता ठाण्यातही दूध भेसळीविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आलीये. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं ठाण्यातल्या तीन टोल नाक्यांवर दूधाची वाहनं अडवून दूधाची चाचणी घेतली.
 
खारेगाव, घोडबंदर रोडवरील गायमूख आणि कळंबोली टोल नाक्यावर सुमारे 100 ते 150 वाहनं अडवून एफडीआयच्या अधिक-यांनी दूधाची चाचणी घेतली. त्यात कळंबोली टोल नाक्यावरील तीन हजार 490 लीटर दूध परत पाठवण्यात आलं. 1 जूनपासून ही मोहीम सुरु करण्यात आलीये.
 
स्वातंत्र्यपूर्व काळातला 'सायमन गो बॅक' असा नारा आजवर ऐकला होता पण आता मुंबईत ढोबळे गो बॅक अशी मागणी मुंबईतील युवक करतायेत. मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना हटवण्यात यावं, अशी मागणी युवक वर्गानं केलीये. पोलिसांच्या समाजसेवा शाखेतर्फे डान्स बार, हॉटेल्सवर कारवाई करताना ढोबळे मनमानी करतात, असा आरोप होतोय. 'ढोबळे गो बॅक' अशा आशयाची पोस्टर्स  कार्टर रोड, बांद्रा ते अंधेरी मार्गावर लावण्यात आली आहेत. याप्रश्नी 21 तारखेला रॅली काढण्याचं आवाहन या तरुणांनी केले आहे.

First Published: Wednesday, June 20, 2012, 15:52


comments powered by Disqus