Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:01
www.24taas.com, पनवेल पनवेलमधल्या खांदा कॉलनी इथल्या रेल्वे फाटकावर मोठी दुर्घटना टळली. नवीन पनवेल इथल्या सेंट जोसेफ हायस्कूलची विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी स्कूल बस दुपारी दीडच्या सुमारास फाटक ओलांडताना बंद पडली.
बस बंद पडली त्या वेळी दोन्ही बाजुंनी रेल्वे येत होत्या. यावेळी या स्कूल बसमधील पालकांनी प्रसंगावधान दाखवत जवळील लाल छत्रीनं रेल्वे लांबवर थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यावेळी बसमध्ये नर्सरीतील ३५ मुलं होती. या प्रकरणी पनवेल पोलीस स्टेशनमध्ये बस चालक भिकू पार्टेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
First Published: Wednesday, June 20, 2012, 16:01