Last Updated: Friday, December 9, 2011, 06:33
झी २४ तास वेब टीम, मुंबई नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. आता पनवेलपर्यंत हार्बर फास्ट होणार आहे.
एमयुटीपीने मुंबई उपनगरांतील रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी तिसऱ्या टप्प्याचा ५२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेलपर्यंत हार्बर लाइन रेल्वेमार्गावर फास्ट लोकल सुरू करणे तसेच विरार-वसई रोड- दिवा- पनवेल हा नवीन कॉरिडॉर सुरू करण्यात येणार आहे.
कल्याण ते कसारापर्यंत ३ ते ४ लाइन, कल्याण ते कर्जतपर्यंत ३ ते ४ लाइन टाकण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबईतही रेल्वे लाइनचा विस्तार करण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत विरार आणि डहाणूदरम्यान तीन ते चार रेल्वे लाइन टाकल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत हार्बर लाइनचा विस्तार करण्यात येणार आहे. बोरिवली ते विरारदरम्यान पाच ते सहा अतिरिक्त रेल्वे लाइन टाकण्यात येणार आहेत.
First Published: Friday, December 9, 2011, 06:33