Last Updated: Saturday, June 23, 2012, 11:12
www.24taas.com, सिंधूदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महान गावच्या जंगलात एका बिबट्याचं मृत शरीर सापडलंय. अत्यंत क्रूर रितीनं या बिबट्याची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे – तुकडे करण्यात आलेत. त्यामुळे बिबट्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
मालवण तालुक्यातील महान गावच्या घनदाट जंगलात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय. या बिबट्याची मान आणि पायाचे पंजे कापून टाकण्यात आलेत. त्यामुळे या बिबट्याच्या तस्करीमागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होतेय. आश्चर्याची बाब म्हणजे, महानमध्ये १० दिवसांपूर्वी एका बिबट्याची शिकार झाली होती. त्यातून वनखात्यानं काहीच धडा घेतला नाही. वनखात्याच्या निष्क्रियतेमुळेच बिबट्याची हत्या झाली, असा आरोप परिसरातील रहिवाश्यांनी केलाय.
.
First Published: Saturday, June 23, 2012, 11:12