गव्हानंतर आता भाताची नासाडी - Marathi News 24taas.com

गव्हानंतर आता भाताची नासाडी


झी २४ तास  वेब टीम, मुरबाड
 
ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरच्या किन्हवली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेला ३०० क्विंटल भात सडून गेला आहे. उघड्यावर ठेवलेली भाताची पोती ऊन वारा पाऊस यांमुळं जिर्ण झाली आहेत. तर भात पूर्णतः सडून गेला. २००८ ते २०११ या काळात ही भात खरेदी करण्यात आली होती.
 
भाताच्या पोत्यांची संख्या जास्त असल्यानं गोदाम पूर्ण भरल्यानंतर उरलेली पोती आवारातच उघड्यावर ठेवण्यात आली आहेत.भाताचा उपयोग राहिला नसल्याचं गोदामपालांनीही मान्य केलं. हा भात उंदीर घुशींनी फस्त केला असून त्याला दुर्गंधी सुटली आहे. सरकारच्या या अनागोंदी कारभारामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे.
 
सडका गहू आणि आता त्यानंतर भात सडतोय त्यामुळे सरकार कृषी क्षेत्राबाबत किती उदासिन आहे ते दिसून येते. त्यामुळे शेतकरी तर त्रस्त झालेच आहे पण आता सर्वसामान्य देखील चांगलेच बेजार झाले आहेत.

First Published: Friday, December 9, 2011, 15:56


comments powered by Disqus