अरेरे... मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी अंत - Marathi News 24taas.com

अरेरे... मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी अंत

www.24taas.com, नवी मुंबई
 
नवी मुंबईतल्या सानपाडा परिसरात खड्ड्यात पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर एक विद्यार्थी रुग्णालयात उपचार घेतोय. इथे एका इमारतीचं बांधकाम करण्यासाठी ५० फूट खोल खड्डा खणला होता त्यात पावसाचं पाणी साचलं होतं.
 
महापालिका शाळा क्रमांक १९ मधले तीन विद्यार्थी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत याठिकाणी आले होते आणि त्यातला एक या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. पण त्याला खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिषेक भारव्दाज याचा मृत्यू झाला.
 
त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र अन्वर शेखने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही आणि या धक्कानेच तो बेशुद्ध झाला. या घटनेची माहिती लगेच अग्निशमन दलाला कळवली होती पण त्यांच्याकडे पुरेशी साधनं नसल्याने अभिषेकचा मृतदेह काढण्यासाठी त्यांना तीन तास लागले.
 
 
 
 
 

First Published: Monday, June 25, 2012, 23:14


comments powered by Disqus