Last Updated: Thursday, June 28, 2012, 23:42
www.24taas.com, पालघर 
जळगाव आणि नागपुरात पोटच्या मुलाचा आईनं जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये मुलानं आईवडीलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
कुरगावात परीतोष संखे यानं आई-वडील घर नावावर करत नसल्याच्या रागातून थेट आई-वडीलानाच जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. बेडरुममध्ये आई-वडीलांना बंद करुन सिलेंडरच्या सहाय्यानं घरातल्या साहित्यांना परीतोषनं आग लावली. घराला आग लागल्याची कल्पना आल्यानंतर आई-वडिलांनी आरडाओरड सुरु केली.
शेजाऱ्यांनी आणि तात्काळ दाखल झालेल्या पोलिसांनी त्वरीत आग विझवत बेडरूमचा दरवाजा तोडून सदानंद संखे आणि सरीता संखे यांना बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा परीतोषला अटक केली आहे.
First Published: Thursday, June 28, 2012, 23:42