सापाचे विष कोटींच्या घरात - Marathi News 24taas.com

सापाचे विष कोटींच्या घरात

झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
सापांचे विष काढून ते विकणारे रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून ६०० ग्रॅम विषाची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये असून ते तब्बल चार कोटी रुपयांना विकण्याचा प्रयत्न सुरू होता , असेही निष्पन्न झाले आहे .
 

ठाण्यात सापाचे विष विक्री करणारे त्रिकुट येणार असल्याचे माहिती क्राइम ब्रँचचे एसीपी रमेश शिवदास आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती . त्यानुसार सापळा रचून अॅण्टी नार्कोटीक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी विजय तिवारी ( ४० ), पंकज कुमार ( ३६ ) आणि मदनमोहन पांडे ( ३४) या तिघांना अटक केली .
 
त्यांच्याकडून जप्त केलेल्या ६०० ग्रॅम विषाची किंमत २ कोटी ४० लाख रुपये असल्याचे शिवदास यांनी सांगितले . या त्रिकुटाने हे विष नेमके कुठून आणले आणि ते कोणाला विकणार होतेण् याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही .
 
सापाच्या विषाचा वापर ओपन हार्ट सर्जरी , कॅन्सर , सर्पदंश यासारख्या आजारांवर औषध तयार करण्यासाठी तसेच अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठीही केला जातो . त्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्याला प्रचंड मागणी असल्याचे पोलिसांनी सांगितले .
 
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, October 2, 2011, 14:00


comments powered by Disqus