मुलींना मारहाण करणाऱ्या महिलेस अटक - Marathi News 24taas.com

मुलींना मारहाण करणाऱ्या महिलेस अटक

www.24taas.com, नालसोपारा
 
नालासोपा-यामध्ये मुलांना मारहाण करणा-या हंसा मेहता या महिलेला अटक करण्यात आली आहे. तिनं आठ वर्षांच्या अश्विनी सिंग आणि तीन वर्षाच्या टक्की हिला मारहाण केली आहे.
 
स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांची त्यांच्यावर नजर पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दोन्ही बहिणी तिच्याकडे सांभाळण्यासाठी देण्यात आल्या होता. या मुलींच्या आई-वडिलांनी त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्या हंसा मेहताकडे सोपवल्या होत्या. फक्त तोंड ओळखीवर या बहिणी हंसा मेहता कडे सोपवण्यात आल्या होत्या.
 
कांदिवली स्टेशनवर या मुली आपल्याकडे सोपवण्यात आल्याचं मेहतानं सांगितलं. मुलींच्या आई - वडिलांचा पत्ताही मेहताकडे नाही. मुली घरात मस्ती करत होत्या आणि पैसे चोरत होत्या म्हणून त्यांना मारहाण केल्याचं तिनं सांगितलं.

First Published: Saturday, June 30, 2012, 22:14


comments powered by Disqus